संपादकांच्या गाडीवर हल्ला केला, कृषी मंत्र्यांच्या गावगुंडावर गुन्हा दाखल झाला.
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी :- कृषि मंञी अब्दुल सत्तार यांनी पाळलेल्या गुन्ड नगरसेवक शेख सोहेल सह भुमाफिया रजा खान वर चिकलठाणा एम आय डी सी पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल. भारतीय दंड संहिता कलम पञकार संरक्षण कायदा अधिनियम कलम 4 व कलम 143,147,149,504,506 कलमानुसार गुन्हा दाखल.
दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या गाडीवर हल्ला करणे नगरसेवक शेख सोहेल यासह अन्य जणांच्या अंगलट.
पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या सह सहाय्यक पोलिस निरीक्षक चौरे यांनी केला गुन्हा दाखल. मा. पोलीस निरीक्षक गौतम पातारे व चौरे यांचे पञकार यांनी मानले आभार.पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कडे मा. पञकार , संपादक विविध राजकीय सामाजिक संघटना यांचे दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी मानले आभार. कृषि मंञी अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील चक्क पन्नास हजार आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, अंध जमातीच्या मतदार व यांच्या परिवाराची दुरावस्था जात प्रमाणपत्र मिळावे . यासाठी दैनिक बुलंद शक्ती वर्तमान पत्राच्या माध्यमातून बातम्या सडेतोड प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सूडबुद्धीने हा हल्ला करण्यात आला. पञकार एकजुटीचा हा विजय मानला जात आहे.



0 टिप्पण्या