तांबुळगाव येथील के.बी.पाटील मा.विद्यालयात,वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तांबुळगाव येथील के.बी.पाटील मा.विद्यालयात,वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 
पालम तालुका प्रतिनिधी :- दिनांक 9 फेब्रुवारी रोजी, कै.काळबाजी बापूजी पाटील माध्यमिक विद्यालयचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांबुळगाच्या सरपंच सौ कल्पना बाबुराव खर्डे तर प्रमुख पाहुणे म्हणून कन्या पालम चे केंद्र प्रमुख मा श्री शुभाष चव्हाण सर,नगर पंचायत पालम चे नगरसेवक मा श्री गजानन भाऊ पवार सर, नगरपंचायतचे मरीबा गायकवाड ,माधवराव पाटील महाविद्यालयाचे,प्रा श्री गजानन गायकवाड सर,प्रा श्री विनोद कांबळे सर,प्रा.कोकाटे सर,डॉ.निर्वळ सर ,  प्रा.सतिष जाधव सर,या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करून सुरुवात झाली त्यानंतर सत्कार समारंभ व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली या मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आसे  गोंधळ,जोगवा गीत ,शेतकरी गीत,कोळी गीत,लावणी, नाटक, आसे वेगवेगळ्या प्रकारची कलां सादर केली   या कार्यक्रमाला परिसरातील बाहेर गावावरून आलेल्या सर्व मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला.  या कार्यक्रमाला प्रेक्षक व मान्यवरांनी  भरभरून प्रतिसाद व आशीर्वाद रुपी बक्षीस ही देऊन दाद दिली. यात एकूण 69000 रुपये  देणगी स्वरूपात प्राप्त झाले या पैशातून काळबाजी बापूजी पाटील विद्यालयात भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी बोअरवेल पाडण्यात येणार आहे व विद्यालयाचा विकास करणार आहेत असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेख सर त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माध्यमिक विद्यालयचे बोईनवाड सर व प्रा गजानन हुळगीर सर यांनी केले तर आभार बाबर सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या