मंग्रा रोहयोचे कंत्राटी कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक अधिकृत कर्मचारी नाहीत :-रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांचे वक्तव्य.

 


मंग्रा रोहयोचे कंत्राटी कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक अधिकृत कर्मचारी नाहीत :-रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांचे वक्तव्य.


पालम तालुका प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत, विविध कामे पालम तालुक्यातील ग्रामीण भागात चालू आहेत, या कामासाठी मजूरांची हजेरी नोंदवण्यास,2005 मध्ये सुधारणा करून, ग्रामरोजगार सेवकांची नेमणूक केली असून,ते हाप्त्याचे हजेरी पत्रक, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्या सहिने, पंचायत समिती कार्यालयात, मग्रारोहयो विभागात दाखल केले जाते,




शासन निर्णय दिनांक 27 मे २०११ नुसार मनरेगाची कामाच्या यंत्रणाची जबाबदारी व भूमिका निश्चित करण्यात आली,सदर निर्णयातील परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 9,व 10 नुसार,कामाच्या ठिकाणी मजुरांना सोयी सुविधा पुरविणे व मजुराची दैनंदिन हजेरी घेणे,आणि इतर नोंदी घेणे इत्यादी कामे करण्यासंदर्भात,जबाबदारी संबंधित यंत्रणातील क्षत्रिय तांत्रिक संवर्ग व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर असून,या कामात संबंधित ग्रामसेवक यांनी मधून मदत करणे व मजुराची उपस्थिती ग्राम रोजगार सेवक यांनी नोंदवल्यावर,त्याची खात्री पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग ग्रामसेवक करतील अशी तरतूद होती.


परंतु ग्रामसेवक संघटनेने दिलेल्या निवेदनाद्वारे ग्रामसेवकांना,निवडणूक आयोगाची कामे,कृषी विभागाची कामे,सामाजिक न्याय विभागाची कामे या सर्व कामामुळे,ग्रामसेवक अतिरिक्त ताण व मानसिक तणावामुळे,मनरेगा सारख्या अत्यंत व्यापक योजनेस,ग्रामसेवक न्याय देऊ शकत नाही,यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी,ग्रामसेवक संघटनेतून वेळोवेळी शासनास येत असल्याने, दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी,याबाबत माननीय मंत्री रोहयो यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आलेल्या बैठकीतील चर्चेनुसार ग्रामसेवक संघटनेची मागणी विचारात घेऊन शासनाने,


ग्रामसेवक संघटनेच्या मागणीप्रमाणे,रोजगार हमी योजनेची व्याप्ती विचारात घेऊन,शासन निर्णय क्रमांक २०११/ प्र.क्र.54/रोहयो-10- अ दिनांक 27 मे २०११ मध्ये सुधारणा करून सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 9 येथील रकान्यातील ग्रामसेवक हा शब्द वगळला व अनुक्रमांक दहा मधील हजेरीपटावरील मजुराची उपस्थिती,ग्राम रोजगार सेवक नोंदवतील व याबाबत खात्री पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग करून प्रमाणित करतील, असे दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजीचा शासन निर्णयात नमूद करण्यात आले असल्याने,


ग्रामसेवक यांनी कामाच्या निघालेल्या मस्टर वर सह्या करण्याचे नाकारले असल्याने, सदर मस्टर झीरो होण्याची शक्यता आहे, म्हणून ग्रामरोजगार सेवक, गटविकास अधिकारी रामोड साहेबांना, कळवण्यासाठी गेले असता, गटविकास अधिकारी रामोड यांनी सांगितले, कंत्राटी कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक अधिकृत कर्मचारी नाहीत, त्यामुळे मस्टर झीरो होणार,कारण मी अधिकृत कर्मचाऱ्याच्या सही शिवाय मस्टर मान्य करु शकत नाही,


नेमके कोणाचे मान्य करावे,शासन निर्णय म्हणतो, तांत्रिक संवर्ग पडताळणी करु शकतो व गटविकास अधिकारी रामोड साहेब म्हणतात कंत्राटी कर्मचारी अधिकृत नाहीत,या ना ना तू तू मध्ये लाभधारक शेतकरी मात्र चेंगरला जातोय,


तांत्रिक संवर्ग व ग्रामरोजगार सेवक यांना सरळ अधिकृत नाही म्हणून कामाला अडथळा होणारा दुर करुन कामे सुरळीत चालू करावे,असे माध्यमांशी बोलताना ग्राम रोजगार सेवक यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या