धनेवाडी येथील 70 शेतकऱ्यांचे वहिवाटीच्या रस्त्यासाठी उपोषण,

धनेवाडी येथील 70 शेतकऱ्यांचे वहिवाटीच्या रस्त्यासाठी उपोषण,
पालम तालुका प्रतिनिधी :-  
तहसीलदारांनी आदेश देऊनही धनेवाडी येथील सत्तर शेतकरी शेतरस्ता आडवल्याने,सत्तर शेतकऱ्यांची वहिवाट, तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला नाकारुन शेतरस्ता खुला करून दिला नसल्याने,  धनेवाडी येथील शेतकऱ्यांनी,13 फेब्रुवारी रोजी सकाळी10 वाजल्यापासून,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला बेमुदत ठिय्या,
या उपोषणाला,पालम पंचायत समितीचे, माजी सदस्य रत्नाकर शिंदे यांनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला.

धनेवाडी येथील शेतकऱ्यांच्या रावराजुर शिवारातील सर्वे क्रमांक 26 व 32 मधील शेतरस्ता बालासाहेब शेंगुळे व लताबाई शेंगुळे यांनी अडकल्याने,त्याविरुद्ध तहसीलदारांनी 16 डिसेंबर 2022 रोजीच्या 23 डिसेंबर रोजी सदर रस्ता खुला करण्यासाठी नोटीस देऊन ही,रस्ता खुला केला नाही.परिणामी शेतकऱ्यांना पेरणी पासून ते शेतमाल काढणीपर्यंत,या दैनंदिन अडचणीच्या विरोधात धनेवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सकाळी निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात केली. निवेदनावर मोकिंदा साबळे, मैनाबाई साबळे, किशन साबळे, धोंडीबा साबळे, पुष्पाबाई साबळे, उत्तम साबळे, गिरजाबाई साबळे, बाजीराव साबळे, देवईबाई साबळे, भगवान साबळे, नंदाबाई साबळे, शंकर साबळे, गयाबाई साबळे, अंजन साबळे, गंगाबाई साबळे, राधाबाई साबळे, राधाबाई साबळे, भागीरथी साबळे, माधव साबळे, बळीराम साबळे यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या