राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती बंजारा समाजाने प्रत्येक तांड्यात साजरी करावी :- दशरथ राठोड

राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती बंजारा समाजाने प्रत्येक तांड्यात साजरी करावी :- दशरथ राठोड
गंगाखेड प्रतिनिधी :- थोर समाज सुधारक आणि राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती बंजारा समाजाने प्रत्येक तांड्यात मोठ्या जल्लोषाने साजरी करावी असे आवाहन बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे मराठवाडा युवा अध्यक्ष तथा जिल्हा संयोजक दशरथ राठोड यांनी केले आहे.

 या संदर्भात प्रसिद्ध दिलेल्या पत्रास असे म्हटले आहे की बंजारा समाजाच्या हितासाठी आणि अस्तित्वासाठी सेवालाल महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले समाजातील अंधश्रद्धा वाईट चालिरीती च्या पाखंडातून बाहेर काढले. 

समाजाने वास्तववादी आणि विज्ञानवादी कास धरावी यासाठी विशेष प्रयत्न केले. थोर समाजसुधारक आणि राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या मूळ विचार भजनाच्या माध्यमातुन पेरले. 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांनी 284 जयंती असून राज्यातील तमाम बंजारा समाज बांधवांनी प्रत्येक तांड्यावर जयंती उत्साह साजरी करावी व एक पांढरा ध्वज आपल्या घरावर लावून आपला स्वाभिमान राखावा असे आव्हान बंजारा क्रांती महाराष्ट्र प्रदेशचे मराठवाडा अध्यक्ष दशरथ राठोड यांनी केला आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या