महीला व पुरूष कार्यकारिणी निवड संदर्भात पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र जिंतूर येथे बैठकीचे नियोजन
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जिंतूर तालुका प्रतिनिधी :- दि.18 जानेवारी 2023 रोजी जिंतूर येथे पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेची परभणी जिल्ह्यात बांधणी करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात दिनांक 18 जानेवरी 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मुख्य मार्गदर्शक म्हणुन पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांची उपस्थिती राहणार असुन.बैठकीची पूर्वनियोजित पाहाणी करण्यासाठी संस्थापक सचिव तथा जनतेचा बातमीदार न्यूज चॅनलचे संपादक श्री शेषराव सोपने मामा यांनी,काल दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी जिंतूर येथे,आयोजक जिल्हा सहसचिव श्री गुलाबराव शिंदे यांची सदिच्छा भेट घेवुन कार्यक्रम स्थळाची पाहणी करत पुढील यशस्वी नियोजन ठरविण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठेच मराठी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मणराव थिटे यांची प्रमुख उपस्थित होती.
संस्थापक सचिव शेषराव सोपने मामा यांनी पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे उद्देश कार्य ध्येय धोरण या विषयी सविस्तर माहिती सांगत महाराष्ट्रात पोलीस हक्क संरक्षण संघटना पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासह, सुशिक्षीत बेरोजगार, महीला,शेतकरी, शेतमजुर व कलाकारांच्या अधिकारासाठी लढा उभारणार असल्याचे मत व्यक्त केले.
ठेचा चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मणराव थिटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील वंचित कलाकारांना सकारात्मक न्याय देण्यासाठी प्रयत्न करून जातिवंत कलाकारांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी शासन दरबारी आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून तांबुळगाव चे माजी सरपंच तथा भावी जिल्हा परिषद सदस्य श्री अनिल उंदरे पाटील व पोलीस हक्क संरक्षण संघटना परभणी जिल्हा संपर्कप्रमुख श्री सुग्रीव बेले आदींची उपस्थिती होती.
दि.18 जानेवारी 2023 रोजी जिंतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या बैठकीस महीला व पुरुष पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात जिंतूर पंचक्रोशीतील महिला व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सह सचिव गुलाबराव शिंदे यांनी केले आहे


0 टिप्पण्या