सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढा उभारणार :- संस्थापक अध्यक्ष: विनोदअण्णा भोसले.

 सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढा उभारणार :- संस्थापक अध्यक्ष: विनोदअण्णा भोसले. 



परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांसह सुशिक्षीत बेरोजगार, महीला, शेतकरी व शेतमजूर यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढा उभारणार असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांनी व्यक्त केले.

दि.8 जानेवारी 2023 रविवार रोजी  सकाळी 11:30 वाजता मातोश्री गुरूकुल गजानन नगर उघडा महादेव परिसर परभणी येथे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून  पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा शाखा परभणी च्या वतीने व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांची पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्या बद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विनोदअण्णा भोसले बोलत होते.

सर्व प्रथम मान्यवरांचा हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री गुरूकुल चे संचालक प्रा हनुमान जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शेषराव सोपने मामा, सहसचिव प्रा आनंद साबणे, गोविंद क्षिरसागर,संघटक विठ्ठल काळे, गंगाखेड तालुकाध्यक्ष राजकुमार मुंढे, गंगाखेड शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण, गुलाबराव शिंदे, सोपान टोले,मधुकर मुळे व सुभेदार अशोक आयनीले आदि मान्यवरांनी उपस्थीती होती.

पुढे बोलतांना भोसले म्हणाले की, आम्ही आम जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी  भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने शासन दरबारी आवाज उठविणार.

शेषराव सोपने मामा बोलतांना म्हणाले की, पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात वाढविण्यासाठी शुशिक्षित युवक व युवतींना जवाबदारी जास्त प्रमाणात देण्यात येणार आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहीदास कदम, भगवान शेळके, सुग्रीव बेले, मालोजी मांगधरे, शेख रिजवान, दिगांबर सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोपाळ कच्छवे, सूत्रसंचालन शहर जिल्हाध्यक्ष हेमराज चोपडे तर आभार विभागीय संपर्क प्रमुख गंगाधर यादव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या