जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबुळगाव येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबुळगाव येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात


पालम तालुका प्रतिनिधी :- तांबुळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे, ध्वजारोहण दिना निमित्त, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष सौ.सारीका ससाणे व सुलोचना गादगे यांनी केले व ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री लक्ष्मण जोरावर सर यांनी केले, सुत्रसंचलन श्री बालाजी लांडगे सर यांनी केले,


ध्वजारोहण नंतर शाळेतील विद्यार्थी यांनी, देशभक्ती पर गीत गायले,तर काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली, प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या, खेळ, निबंध स्पर्धा,भाषण, रांगोळी,व विविध कार्यक्रम घेतले होते, त्यानिमित्ताने बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.


 यावेळी गावातील महिला व पुरुष मंडळी व शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या