राजमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन

 राजमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन



परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा शाखा परभणी च्या वतीने पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोदअण्णा भोसले यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते 


यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस  पुष्पहार घालून  पूजन करण्यात आले.


 मातोश्री गुरूकुल गजानन नगर उघडा महादेव परिसर परभणी येथे,परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांची,पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्या बद्दल व सर्व नूतन केंद्रिय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा,पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने संपन्न.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक हनुमान जाधव,संचालक मातोश्री गुरूकुल गजानन नगर उघडा महादेव परिसर परभणी,

विशेष उपस्थिती श्री शेषराव सोपने  मामा संपादक जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल तथा सचिव पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र,


यावेळी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी, जिल्हासंपर्कप्रमुख पदी श्री सुग्रीव बेले, गंगाखेड तालुका अध्यक्ष पदी श्री राजकुमार मुंडे, गंगाखेड शहर प्रमुख पदी श्री सुधाकर चव्हाण गंगाखेड तालुका संपर्क प्रमुख पदी श्री सोपान टोले व पालम तालुका अध्यक्ष पदी श्री काशिनाथ नामदेव रोकडे यांची निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.


संस्थापक अध्यक्ष श्री विनोदअण्णा भोसले यांनी संघटनेच्या माध्यमातून कार्य करताना, पदाधिकारी यांनी कार्य कसे करावे या विषयी सविस्तर माहिती दिली,तर सचिव सोपणे मामा यांनी, संघटना वाढीसाठी प्रयत्न शिल व कर्तव्यदक्ष राहुन संघटना जोडण्यासाठी, जनसंपर्क वाढवाणसाठी मार्गदर्शन केले,

 

 प्राध्यापक आनंद साबणे सहसचिव पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र, 

श्री विठ्ठल काळे संघटक पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र, गोविंद क्षिरसागर,

इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत वरील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला,

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी जिल्हा अध्यक्ष श्री गोपाळ कच्छवे यांनी सूत्रसंचालन हेमराज चोपडे तर आभार प्रदर्शन श्री गंगाधर यादव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या