जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मरडसगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
गंगाखेड प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मरडसगाव प्रजासत्ताक 74 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी ठीक 7:00 वाजता जिल्हा परिषद शाळा येथून गावात प्रभात फेरी काढण्यात आली 7:15 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण झाले त्यानंतर 7:25 वाजता पशुवैद्यकीय दवाखाना येथील ध्वजारोहण झाले त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मरडसगाव येथील ध्वजावंदनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर ठीक सकाळी साडेआठ वाजता विविध कलागुणांचा कलारंग हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात शाळेतील विविध मुला-मुलींनी देशभक्तीपर गीते समाज प्रबोधन गीते सादर केली कार्यक्रमाला गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला गावचे सरपंच विक्रम काळे व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी शेतीसाठी शाळेचे मुख्याध्यापक अय्या सर, सूर्यवंशी सर, कुंडगीर सर ,मिरजगावे मॅडम श्री पुरी सर ,चव्हाण सर श्रीरामे सर ,दयाळ सर यांनी परिश्रम घेतले


0 टिप्पण्या