पालम येथील शनिवार बाजार सुविधां पासून कोसो दूर, जिकडे पाहावे तिकडे गर्दागोंधळ भरपूर,
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- पालम येथे नगरपंचायत अस्तित्वात असून सुद्धा पालम येथील शनिवार बाजारामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिसून येत नाहीत विशेषतः गुरांसह भाजीपाला बाजार भरत असतानाही नगरपंचायत प्रशासनाने शनिवार बाजारच्या विकासाला बगल दिली असल्याचे चिन्ह दिसून येत आहे
शनिवार बाजारामध्ये भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यास पाणी पिण्याची सुद्धा सोय नाही
स्वच्छतागृहाची सुद्धा सोय या ठिकाणी उपलब्ध नाही
पालम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार मैदानात प्रत्येक शनिवारी भाजीपाला बाजार भरतो पुढे याच मैदानात दर सोमवारी गुरांचा बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आला तूर्तास कोविड मुळे त्यावर बंदी असल्यामुळे गुरांचा बाजार भरत नाही
परंतु मध्यंतरी कोविड काळातही भाजीपाला बाजार भरविण्यात येऊ लागला आज घडीला विक्रेत्यांना बाजारात बसण्यासाठी जागा मिळत नाही एवढा प्रतिसाद त्याला मिळतो म्हणून विक्रेते फळा रोड या राज्य महामार्गावर बसतात.तरीही बाजारात सुविधांचा पत्ता नाही जरी भौतिक सुविधांसाठी निधीचे कारण समोर करण्यात येत असले तरीही प्राथमिक सुविधांसाठी किरकोळ निधी लागतो ते देखील खर्च करण्याची तयारी नगरपंचायतीची नाही
परिणामी एक हि स्वच्छतागृह देखील उभारण्यात आलेले नाही,जिथे प्रत्येक आठवड्याला हजारो नागरिक खरेदीसाठी येतात त्यांच्या गैरसोयीची चिंता ना लोकप्रतिनिधींना आहे ना प्रशासनाला आहे म्हणून स्वच्छालय ,शुद्ध पिण्याचे पाणी, भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी मोठ्या मैदानाचे कॉंक्रिटीकरण देखील करण्यात आलेले नाही तरी पण सत्ताधाऱ्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही
त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना आणि विक्रेत्यांना लघुसंखेसाठी बाजार सोडावा लागतो शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागते अन्यथा विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते याकडे प्रशासनाने लक्ष देऊ नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे



0 टिप्पण्या