प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,या वेळी पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक सचिव श्री शेषराव मोहणाजी सोपणे मामा यांना युट्यूब चॅनल पत्रकारीता व शिवारत्न पुरस्कार प्रदान
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण सोहळा व प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा आदी सामाजिक उपक्रम संपन्न
वीर वारकरी सेवा संघ राष्ट्र जन फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विमानाने दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी संकट मोचन हनुमान मंदिर सभागृह वसमत रोड लोकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 14 टाळकाप्रमाणे 14 सामाजिक व्यक्तींचे सत्कार समारंभ संपन्न या वेळी, युट्यूब चॅनल पत्रकारीता व शिवारत्न सन्मान पत्र देऊन, पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक सचिव श्री शेषराव सोपणे मामा यांना सन्मानित करण्यात आले,
यावेळी उद्घाटक -भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब महाराज मोहिते पाटील, कार्यक्रमाचे स्वागत- अध्यक्ष माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल , जयंती महोत्सव समिती अध्यक्ष- वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे, प्रमुख अतिथी -युगंधर फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव अडागळे, विमलताई पांडे,पुनम ताई,मारवा सुरेखा लखमले, कल्पना धावडकर रुक्मीनबाई जाधव इत्यादी उपस्थित होते,सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रभावती नगरी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक लोकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी केले, आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या