वडिलांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून,डाॅ. गाडगीळांनी घालून दिला प्लॅस्टिकमुक्तीचा आदर्श.
पालम तालुका प्रतिनिधी :- डॉक्टर असोशिएशनचे तालुका अध्यक्ष डाॅ.रघुराज गाडगीळ यांनी त्यांच्या वडिलांच्या कै. उद्धवराव गाडगीळ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्लॅस्टिक मुक्तीचा
एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला.सध्या प्रत्येक लग्न, मुंज, पुण्यतिथी तसेच विविध सामाजिक कार्यक्रमात जेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पञावळ, द्रोण,ग्लासचाच सर्रास वापर होतोय व याचे पर्यावरणला तसेच प्राण्यांवर होत असलेले दुष्परिणामही पहात आहोत.विचार सगळेच करतात पण यावर तोडगा काढून कृती करणारे फारच कमी आढळून येतात.
यावर डाॅक्टर रघुराज गाडगीळ यांनी नामी युक्ती शोधत वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात केळीचे पान, त्याचेच द्रोण व कागदी ग्लास वापरत एक हजारांहून अधिक आप्तेष्ट, नातेवाईक व मिञमंडळींच्या भोजनाची व्यवस्था करत समाजासमोर एक नवीन आदर्श पायंडा ठेवला आहे.
पुण्यतिथीनिमित्त भागवतकार प.पु.आचार्य बाभुळगावकर शास्ञी (मनमाड) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले.प्रवचणात शास्ञीजींनी स्नेह,प्रेम व आईवडीलांचे महत्त्व सांगीतले.त्यांनी आई म्हणजे प्रेम व बाप म्हणजे अस्तित्व हे आयुष्यभर लक्षात ठेवण्याचे सांगितले तसेच भावा भावाचा एकमेकांवरचा विश्वास म्हणजेच उत्कट प्रेम आहे व हे प्रेम हे जीवनाचे सार असून पुढच्या पिढीला ते भरभरून दिले पाहिजे आई-वडिलांचे जीवनातले महत्त्व विशद करत त्यांनी संत चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत कबीर यांचे विचार उपस्थित त्यांना पटवून दिले.
धार्मिक,सामाजिक तसेच पर्यावरणपुरक प्लॅस्टिकमुक्त केळीच्या पञावळी,द्रोणची संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल
डाॅ.गाडगीळाचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.



0 टिप्पण्या