पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या वतीने
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाहनांच्या बदल्यात पुस्तकांचे वाटप.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :-वैभव नौगर, वसमत रोड परभणी येथे पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र या सामाजिक परिवर्तनवादी संघटनेच्या परभणी जिल्हा महिला आघाडीच्या वतीने मकर संक्रांत निमित्त दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संत जनाबाई,राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर या सारख्या महानाईकांच्या विचाराला प्रभावित होऊन महिलांनी या कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन वान म्हणुन स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व शिक्षणाची खरी दैवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ. सुनिता विनोदराव भोसले व सौ. प्रतिभा दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या परिवर्तनवादी कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा सौ. कांचन रंजीतराव कारेगांवकर व सौ.सुनिता बालासाहेब यादव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन सौ.सुनिता विनोदराव भोसले,सौ.रुपाली मंजाभाऊ शिंदे, सौ सोनाली सुर्यवंशी, सौ कृतिका सुधीरराव पौळ व सौ.प्रतिभा दीपकराव चव्हान यांनी केले होते.
यशस्वी साठी
कु.अमृता भोसले, कू.सायली सुर्यवंशी,कू.साक्षी पार्डे, कू.संस्कृती सुर्यवंशी,कु.पूजा सालगोडे आदींनी परिश्रम घेतले.
संक्रांती निमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आगळा वेगळा उपक्रम राबविल्या बद्दल आयोजक महिलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



0 टिप्पण्या