ग्रा.पं.बेलवाडी येथे लोकनियुक्त सरपंच मा.श्री.तुकाराम खांडेकर तर उपसरपंच सौ.अनिता राठोड
गंगाखेड प्रतिनिधी नितीन कांबळे :- तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या नेमक्याच निवडणूका झाल्या, शासनाने जनतेतून सरपंच पदासाठी निवड करण्याचे जाहीर केल्याने,सर्व जनतेला सरपंच कोन होणार, ही उत्सुकता होती,
गावातील सर्व नागरिकांनी सरपंच पदासाठी योग्य व्यक्तीची निवड केली, त्या अनुषंगाने ग्रा.पं.बेलवाडी येथे लोकनियुक्त सरपंच मा.श्री.तुकाराम खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायतीची पहिली, विशेष मासिक सभा घेऊन बिनविरोध उपसरपंच पदासाठी सौ.अनिता मंचक राठोड यांची निवड करून, पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला ,
यावेळी सनमानीय सदस्य सौ.शोभाताई घोगरे सौ मिनाक्षीताई फुटके,मा.श्री शेषेराव सलगर,मा.श्री साहेबराव राठोड,मा.श्री.नंदिवाड दादाराव ,मा.श्री.नवनाथ राठोड व गावातील सनमानीय जेस्ट मंडळी आणी निरीक्षक मा.श्री.सुरवसे साहेब,मा.ग्रामसेवक गादेवाड साहेब इत्यादी उपस्थित होते.
यावेळी ग्रामसेवक गादेवाड यांनी प्रास्ताविक केले व नवनिर्वाचित सरपंच खांडेकर यांनी आभार व्यक्त केले.



0 टिप्पण्या