हे रयतेचे स्वराज्य व्हावे 'श्री' ची इच्छा नव्हे तर मातोश्री ची इच्छा होती :- व्यख्याते विनोदअण्णा भोसले
जिल्हा प्रतिनिधी वाशीम :- परकीय मोगलांच्या गुलामगिरीत तीनशे वर्षे जखडलेल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती,ज्ञान, संघटन, चातुर्य, चारित्र्य व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देऊन रयतेचे स्वराज्य निर्माण केले.
म्हणून हे रयतेचे स्वराज्य व्हावे श्री ची इच्छा नव्हे तर मातोश्री ची इच्छा होती असे प्रतिपादन व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांनी व्यक्त केले.
दि.12 जानेवारी 2023 रोजी मौजे गोहोगांव हाडे ता. रिसोड जि. वाशीम येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भोसले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड मतदार संघाचे आमदार श्री अमितभाऊ झनक तर प्रमुख पाहुणे म्हणून वैभव सरनाईक, संतोष जाधव, तेजस वानखेडे, राहुल बोडखे, गोविंद क्षिरसागर,दत्ता कदम,संतोष गुंगे, मानिक भालेराव आदि मान्यवरांची उपस्थीती होती.
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्या निमित्त व्याख्याणासह भव्य रक्तदान शिबिर व नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
पुढे बोलतांना भोसले म्हणाले की, आज संपत्ती कमविणे सोपे झाले तर संतती घडविणे अवघड झाले आहे यासाठी आजच्या स्त्रियांनी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तके वाचून आपल्या मुलांना शिक्षण व संस्कार देण्यासाठी प्रयत्न करावा तरच जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल.
कार्यक्रमाचे आयोजन आदिशक्ती मित्र मंडळ, रॉयल पाटील मित्र मंडळ, शंभूराजे मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी गोहोगांव यांनी केले होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्रीधर मवाळ,
सूत्रसंचालन प्रा किशोर मवाळ तर आभार संतोष मवाळ यांनी व्यक्त केले.




0 टिप्पण्या