रोहीणी लोककला ग्रामीण मंडळांच्या गोंधळ कलेतील गोंधळ गीत आता भोपाळमध्ये होणार सादर

 


रोहीणी लोककला ग्रामीण मंडळांच्या गोंधळ कलेतील गोंधळ गीत आता भोपाळमध्ये होणार सादर


परभणी जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय संस्कृतीमधील एक सामजालच्या मनाला वेड लावणारी गोंधळ गीताची परंपरा आहे, टीव्ही, मोबाईल या तंत्रज्ञानाचा माध्यमातून गोंधळ कला मध्यंतरी लोप पावत आली असता,रोहीणी लोककला ग्रामीण मंडळांच्या माध्यमातून पुन्हा गोंधळ गीताची पर्वणी जनसमान्य जनतेच्या समोर येत आहे,



मध्यप्रदेश सरकारच्या जनजातीय लोककला आणि बोलीभाषा विकास अकादमीच्या वतीने २६ ते ३० जानेवारी दरम्यान रविंद्र भवन भोपाळ येथे आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने भटक्या विमुक्त समाजातील लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे या हेतुने लोकरंग महोत्सव २०२३ रोजी,या महोत्सवात जिल्ह्यातील वझुर येथील रोहीणी लोककला ग्रामीण मंडळाच्या वतीने पारंपारिक गोंधळ ही लोककला सादर करण्यात येणार आहे.


या लोकरंग महोत्सवात जिल्ह्यातून ९ कलाकारांची निवड झाली आहे. यात प्रल्हाद अंबादास नरवडे,अशोक तुकाराम नरवडे,उत्तम तुकाराम नरवडे,बालाजी अंबादास नरवडे, सुभाष बाबुराव सोनवणे,मदन तुकाराम नरवडे,सतीश विजयकुमार नरवडे,जिवन अरुण नरवडे,भगीरथ मिरासे आदी कलाकारांची लोकरंग महोत्सवासाठी निवड झाली असून हे सर्व कलाकार २५ जानेवारी रोजी मध्यप्रदेश सरकारच्या या लोकरंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी भोपाळकडे रवाना होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या