पालम तालुक्यातील जि.प.शाळा सेलु येथिल कृष्णा मदने,अबॅकस परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकावर.

 पालम तालुक्यातील जि.प.शाळा सेलु येथिल कृष्णा मदने,अबॅकस परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकावर.


 

पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- नांदेड येथे घेण्यात आलेल्या 5 व्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये  कृष्णा संजय मदने याने देशातून अ  कॅटेगिरी  मध्ये दुसरा क्रमांक पटकावला तसेच इतर 7 विद्यार्थ्यांना बेस्ट अचिएव्हर अवॉर्ड आणि मेडल मिळाले.

त्याच बरोबर धुळगंडे मेट्रो ब्रेन अबॅकस कलासेस चे संचालक शिवाजी भाऊसाहेब धुळगंडे यांना 'टॉप फ्रॅंचीस ऑफ द इयर अवॉर्ड ' मिळाला .


      नांदेड येथे 22जानेवारी 2023 मेट्रो ब्रेन अबॅकस आयोजित पाचवी नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन आयोजन केले होते.त्यात धुळगंडे मेट्रो ब्रेन अबॅकस कलासेस चे एकूण 8 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी कृष्णा संजय मदने या जि. प. शाळा सेलू ता.पालम येथील विद्यार्थ्याने देशातून दुसरा क्रमांक पटकवला तसेच नंदिनी शिंदे ,  मिताली शिंदे,गणेश जगनाडे, गंगाप्रसाद जगनाडे, कृष्णा शिंदे, शिवानी गायकर  या विद्यार्थ्यांना बेस्ट अचिव्हर ट्रॉफी आणि मेडल मिळाले.पुरस्कार वितरण सोहळा खालील मान्यवारांच्या हस्ते देण्यात आले नांदेड गुरुद्वाऱ्याचे अध्यक्ष बाबा कुलदीप सिंगजी, मेट्रो ब्रेन अबॅकस संचालक संतोष लोहारे  आणि सीमा लोहारे यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री मेघा शिंदे, अभिनेता अहमद देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या