मौजे तांबुळगाव येथील महिला बचत गटाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी.
पालम प्रतिनिधी :- मौजे तांबुळगाव येथील सर्व महिला बचत गटांच्या वतीने, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठ शिवणी सर्कल बचत गट प्रमुख,सौ. सविता सोपणे यांच्या अध्यक्षतेखाली खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आद्य कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. सविता सोपणे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस, पुष्पहार घालून व पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका,मुलींच्या शिक्षणाच्या जनक,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून, अध्यक्षीय भाषणात बोलताना सविता सोपणे यांनी,महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी बचत गटात जास्तीत जास्त गुंतवणूक करून व त्या आधारे छोटे-मोठे उद्योग करून, आपला आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला,सौ सुलोचना गादगे,सौ ससाने मॅडम अंगणवाडी ताई,सौ.महामाया ससाने मॅडम,सौ दैवशाला सदगे अंगणवाडी मदतनीस, सौ कल्पना खर्डे सरपंच तांबुळगाव व सर्व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे प्रस्ताविक,सौ.सुलोचना गाडगे यांनी केले,तर आभार प्रदर्शन दैवशाला सदगे यांनी केले, व हळद-कुंकू लावून सर्व महिलांचा सौभाग्य सत्कार करण्यात आला.





0 टिप्पण्या