राज्यस्तरीय किन्नर महोत्सवाला पूर्णतः सहकार्य करू - पालकमंत्री अतुल सावे

 राज्यस्तरीय किन्नर महोत्सवाला पूर्णतः सहकार्य करू - पालकमंत्री अतुल सावे 



आश्रय सेवा केंद्राच्या वतीने शेख आयेशा यांचे निवेदन


बीड जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील पहिल्या बीड येथे होणाऱ्या किन्नर महोत्सवाला शासकीय मान्यता देण्यासंदर्भात मीडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्राच्या वतीने बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांना अध्यक्षा शेख आयेशा रफिक यांनी निवेदन दिले. यावर पालकमंत्री अतुल सावे यांनी बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किन्नर महोत्सवाला सरकार पूर्णपणे सहकार्य करेल असे अभिवचन दिले. 

मुंबई मंत्रालय येथील सहकार मंत्री तथा बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या मंत्री कार्यालयात मीडिया डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत आश्रय सेवा केंद्राचे अध्यक्ष शेख आयेशा रफिक यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन किन्नर महोत्सवा संदर्भात लेखी निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदनाद्वारे मागणी करतांना शेख आयेशा म्हणाल्या की, ट्रांजेंडर, तृतीयपंथी,किन्नर समाजाचा आजपर्यंत बीड येथे साधा सामूहिक मेळावा सुद्धा झालेला नाही. त्यांच्या देखील पारंपारिक आणि आधुनिक कला लपलेले आहेत, त्यांच्यातील कलेला मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी राज्यस्तरीय किन्नर महोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार आहे. यासाठी शासनाने मान्यता देऊन येणाऱ्या खर्चाला अनुदान मंजूर करावे, अशी मागणी करून किन्नर महोत्सवाचे पालकत्व स्वीकारावे अशी मागणी केली यावर बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आपण किन्नर महोत्सव बीडमध्ये पहिल्यांदा आयोजित करण्याचा विचार केला आहे हे बाब कौतुकास्पद असून राज्य सरकार आपल्या या अनोख्या उपक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्णतः सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. असे अभिवचन दिले.यावेळी मंत्रालयामध्ये आमदार सुरेश आण्णा धस भारतीय जनता पार्टी बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह किन्नर कम्युनिटी चे शिष्टमंडळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या