दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याची जयंती साजरी

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याची जयंती साजरी



 लोहा प्रतिनिधी बळीराम येवले :- समाज प्रबोधनाच्या उद्देशाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला सुरू केलेल्या मराठीतील पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा आज स्थापना दिन.मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. भरकटलेल्या समाजाला दिशा दाखवण्याच्या उद्देशाने 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू करणारे, मराठी वृत्तपत्रविश्वाचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया भक्कम करण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 

विविध प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे आवाज उठविणारे व सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम अखंडितपणे करणारे, तसेच सांविधानिक मूल्यांना जपणाऱ्या व लोकशाही टिकवण्यासाठी सजग, सतर्क, निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या, आपल्या निर्भिड आणि निःपक्ष विचारांतून, लेखणीतून समाज जनजागृतीचे अनमोल कार्य करणाऱ्या आणि 

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर बंधू - भगिनींना 'पत्रकार दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या