भारतीय संस्कृतीतील सौभाग्याचा सण, संक्रांती निमित्त रामनगर येथील महिलांनी केले विविध उपक्रमांचे आयोजन.

 भारतीय संस्कृतीतील सौभाग्याचा सण, संक्रांती निमित्त रामनगर येथील महिलांनी केले विविध उपक्रमांचे आयोजन.



पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- भारतीय संस्कृतीत प्रत्येक पारंपरिक सणाला वेगवेगळ्या प्रांतातील लोक, आपापल्या पद्धतीने सण साजरा करतांना पारंपरिक, सांस्कृतिक,व धार्मिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करतात.



यावेळी अतिशय उत्साह,आनंद व एकमेकांना मान सन्मान देण्याच्या पद्धतीत रूढी परंपरेनुसार फार महत्त्व दिल्या जात. त्यामागे पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा दीपावली ,दसरा ,गणेश चतुर्थी , नवरात्र, यासारखाच महत्त्वाचा व सौभाग्याचा सण म्हणजे मकर संक्रांत



पालम शहरातील रामनगर येथील महिलांनी मकर संक्रात या सणानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये लहान मुलांना खेळणी बनवण्यासंदर्भात माहिती,लहान मुलांकडून विविध वस्तू बनवून त्या संदर्भात मार्गदर्शन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच मकर संक्रांतीचे औचित्य साधून, रांगोळीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचे वेगवेगळे संदेश दिले,स्वच्छता प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचे फलक देखील यावेळी या ठिकाणी लावून त्याबाबत महत्व सांगण्यात आले,व

 प्लास्टिकला गुड बाय स्वच्छ ठेवू धरणी माय अशा घोषणा दिल्या.


यावेळी हळदी कुंकवाच्या वाणात प्लास्टिकचा वापर न करता वानासाठी कापडी पिशव्यांचा वापर करत पर्यावरणाचा संदेश दिला.

यावेळी रामनगर येथील सत्यभामा  पौळ मीनाताई कदम, रमा देशमुख, डॉ रुपाली  पौळ  , प्रतिमा पौळ,

पाटील मॅडम, उर्मिला चाफळे, सोनाली कल्याणकर, दिपा शर्मा, उर्मिला गबाळे, शीला दुधाटे,सविता पत्तेवार,अदिती जाधव इत्यादी महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या