नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून,तहसीलदार यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांने दिला आत्मदहनाचा इशारा


नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून,तहसीलदार यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांने दिला आत्मदहनाचा इशारा

पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :-पालम शहरापासून जवळच असणाऱ्या खोरस येथील शेतकरी चिंतामणी शंकरराव खंडागळे व त्यांची पत्नी आशाताई चिंतामणी खंडागळे शेत सर्वे नंबर 15/2 या शेतामधील सोयाबीन कापलेली सोयाबीनची गंजी अचानक वादळी वारा व विज पडल्यामुळे या शेतकऱ्याने शेतात पिकवलेले सोयाबीन या पिकाची गंजी जळून खाक झाली त्यामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे जवळपास अंदाजे या शेतकऱ्याचे सहा ते सात लाख रुपयांचे सोयाबीन या विजेच्या अचानक पडलेल्या विजेमुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे सदरील या शेतकऱ्याने व त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या सोयाबीन पिकाचा विमा भरण्यात आलेला होता पण विमा कंपनीने या शेतकऱ्याला अल्प नुस्कान भरपाई देण्यात आली शंभर टक्के नुकसान भरपाई चा पंचनामा करून सुद्धा या शेतकऱ्याला विमा कंपनीने तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे त्यामुळे या शेतकऱ्यावर जाणीवपूर्वक अन्याय झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदरील शेतकऱ्याने दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी

जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी चिंतामणी शंकराव खंडागळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या