राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारे धान्य लाभार्थ्याना मोफत देण्याची सरकारची भूमिका
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- सर्व अन्नसुरक्षा योजना लाभधारक यांच्या साठी शासनाने घेतला निर्णय १)सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी २) सर्व अन्नधान्य वितरण ३) सर्व उपनियंत्रक शिधावाटप मुंबई, अधिकारी,यांना केंद्र शासनाचे दि.28.12.2022 रोजीचे पत्राद्वारे आदेशित.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रु. ३ प्रतिकिलो या दराने तांदूळ, रु. २ प्रतिकिलो या दराने गहू १ प्रतिकिलो या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, आता केंद्र आमनाने राष्ट्रीय अन्न अंतर्गत सर्व सामान्यांना १ जानेवारी २०२३ पासून पुढील एक वर्षाकरीता मोफत अन्न देण्याचा निर्णय केंद्र शासनाने संदर्भाधिन पत्रान्वये घेतला आहे. त्यानुसार दि. १ जानेवारी २०२३ ते दि. ३१. डिसेंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा सूचना केंद्र शासनाने संदर्भाधिन पत्रान्वये दिल्या आहेत.
१) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व राज्यातील योजनेकरीता अधान्य वितरीत केल्याची स्वतंत्र पावती सामान्यता देण्यात यावी.
२) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत वितरीत अधान्याचा पावतीवर मोफत धान्य वितरण भारत सरकारद्वारे दिले जाणार आहे असे सूचित करावे.
३)राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि राज्य योजनांतर्गत वितरणासाठी स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे.
२) केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाबाबत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात याची तसेच आपल्या अधिनिस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांना व रास्तभाव दुकानदारांना अवगत करण्यात यावे, अना सूचना सदर पत्रान्वये देण्यात येत आहे.


0 टिप्पण्या