पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर पुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात रुजू झाल्याने, पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुकाध्यक्षाच्या वतीने सत्कार.

 पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर  पुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात रुजू झाल्याने, पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुकाध्यक्षाच्या वतीने सत्कार.



गंगाखेड प्रतिनिधी :- वसुंधरा बोरगावकर यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली,व गंगाखेड तालुक्यात गुन्हेगारीवर वचक निर्माण केला असला तरी,तत्कालीन पोलीस अधीक्षकानी वसुंधरा बोरगावकर यांची,पोलीस नियंत्रण कक्षात बदली केल्याने, वसुंधरा बोरगांवकर यांनी,औरंगाबाद येथील मॅट खंडपीठात दाद मागितली असता,१३ नोव्हेंबररोजी मॅटने बोरगावकरांच्या बाजूने निकाल दिला.व पुन्हा वसुंधरा बोरगांवकर यांना, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गंगाखेड पोलिस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून,परभणीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले.


गंगाखेड परिसरातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या वसुंधरा बोरगावकर यांची गंगाखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी पुन्हा नेमणूक करण्यात आली असल्याने.पोलिस ठाणे गंगाखेड येथे रिपब्लिकन वार्ता न्युजचे जिल्हा प्रतिनिधी व पोलिस हक्क सरंक्षण संघटनेचे गंगाखेड तालुकाध्यक्ष राजकुमार मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी पोलिस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या