पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र कार्यकर्ता विचार मंथन बैठक संपन्न.

 पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र कार्यकर्ता विचार मंथन बैठक संपन्न.



गंगाखेड तालुका प्रतिनिधी :- पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री विनोदअण्णा भोसले यांच्या आदेशानुसार, व श्री संस्थापक सचिव श्री शेषराव सोपणे मामा,यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हाध्यक्ष श्री गोपाळ कच्छवे यांनी, गंगाखेड तालुकाध्यक्ष श्री राजकुमार मुंडे यांना आदेशित करून, गंगाखेड तालुक्यातील कार्यकर्ता विचार मंथन बैठक आयोजित केली

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी तांबुळगावचे माजी सरपंच श्री अनिलराव उंदरे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख श्री सुग्रीव बेले होते.


पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक सचिव श्री शेषराव सोपणे मामा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला, या वेळी पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्रच्या नियम व अटी आणि पदाधिकारी यांचे कार्य या विषयी सविस्तर चर्चा केली, तसेच गंगाखेड तालुका सचिव पदासाठी श्री सय्यद ताजुदिन फरिद यांच्या नावाची शिफारस श्री सोपान टोले यांनी केली व तालुकाध्यक्ष राजकुमार मुंडे यांनी प्रास्तावित नोंद केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाखेड तालुका संपर्क प्रमुख श्री सोपानराव टोले यांनी केले, प्रस्ताविक पोलिस हक्क संरक्षण संघटना गंगाखेड शहर प्रमुख श्री सुधाकर चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन पोलिस हक्क संरक्षण संघटना गंगाखेड तालुकाध्यक्ष श्री राजकुमार मुंडे यांनी केले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या