जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडगाव (स्टे ) तालुका सोनपेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सोनपेठ तालुका प्रतिनिधी :- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री रामेश्वर बचाटे पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली, यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारून मासाहेबांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सचिन बचाटे, प्रल्हाद बचाटे, बिभीषण व्हावळे, भागवत पुरी, रामभाऊ नावळे, कचरूबा बाळसकर, तुकाराम बचाटे ,संग्राम बचाटे, गजानन बचाटे,व महिला प्रतिनिधी सौ पूजा बचाटे व सौ शकुंतला बचाटे याही उपस्थित होत्या.
या प्रसंगी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक श्री गजानन बचाटे यांनी राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा शाळेस भेट दिली. शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी शाळा व परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली त्याचबरोबर शालेय परिसर सुशोभित करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी शिवानी इंगोले व कुमारी ज्ञानेश्वरी नावळे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती स्वामी मॅडम व श्री उटेकर सर यांनी सहकार्य केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री म्हेत्रे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.




0 टिप्पण्या