पोलीस हक्क संरक्षण समितीच्या संस्थापक अध्यक्ष पदी व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांची निवड.

 पोलीस हक्क संरक्षण समितीच्या संस्थापक अध्यक्ष पदी व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांची निवड. 



औरंगाबाद प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी,महिला कर्मचारी, महिलांच्या न्याय व हक्कासाठी कार्य करणाऱ्या पोलीस हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष पदाचा मा श्री विनोदअण्णा भोसले यांनी आज दिनांक १ जानेवारी २०२३ वर्षे प्रारंभ दिनाचे औचित्य साधून पदभार स्वीकारला.



महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, श्री विनोदअण्णा भोसले, यांनी १९९६ ते २०२२ पर्यंत २६ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक,पक्ष व संघटनेचे पदे भूषविली असून, प्रत्येक पदाच्या अधिकारा प्रमाणे न्याय मिळवून दिला असल्याचे,व वाग्चातुर्य, कर्तव्य तत्परता या सर्व बाबींचा विचार करून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलिस हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य, विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे, श्री विनोदअण्णा भोसले यांना,सदर समितीचे संस्थापक अध्यक्ष पदी निवड केली व कारभाराचे संपूर्ण सुत्र हाती देण्यात आले,



विनोद अण्णा भोसले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले व ज्या प्रमाणे सर्वांनी इश्वासाने दिलेल्या पदाचा, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, महिला कर्मचारी, व इतर सामाजिक, राजकीय,व शेतकरी बांधवांच्या,न्याय व हक्कासाठी,तनमन धनाने, कार्य करून, संस्थापक अध्यक्ष पदाचे सोने करून दाखविल,असे वक्तव्य केले.


यावेळी, पोलिस हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र चे, सरचिटणीस श्री आयुब खान पठाण, संघटक विठ्ठल काळे, कार्याध्यक्ष उद्धव काकडे, विभागीय संपर्क प्रमुख गंगाधर यादव , सह सचिव प्रा. आनंद साबणे, औंरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष मेजर अशोक सानप व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबुराव बडे, उपाध्यक्ष औंरंगाबाद जिल्हा नितिन जायभाये, प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य अनिस अहमद, नझिम काझी,महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या