नंदुर शिवणी येथील अवैद्य वाळू उपसा बाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल.

 नंदुर शिवणी येथील अवैद्य वाळू उपसा बाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे  तक्रार दाखल.



महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी 




सोलापूर प्रतिनिधी :-  सोलापूर जिल्ह्यात वाळू उपसा करण्यास बंदी मनाई असताना  देखील उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर शिवणी पाकणी  या  सीना पात्रातून  बेसुमार वाळू उपसा केला जातं असून सोलापूर जिल्ह्यात वाळू ठेका बंद असल्याने वाळूचे दर गगनाला भिडले असून प्रतिब्रास 10000/ दहा हजार रुपये  इतका असून वाळूला सोन्याचा भाव आलेला आहे  याचा फायदा काही वाळू माफिया महसूल प्रशासन मधील प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांच्या संगनमताने उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर शिवणी येतील सीना नदी पात्रातून प्रचंड प्रमाणात वाळू उपसा केला जातं असून या बेसुमार वाळू उपशामुळे  नदी पात्रात मोठे खड्डे पडलेले आहेत वाळू माफिया यांच्याकडून दररोज रात्री जेसीबी व अन्य साधनाकडून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे  या वाळू उपसा बाबत   अधिकारी कर्मचारी यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने शिवनी व नंदुर येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया वर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीकांत कोळी व बाळकृष्ण सदाफुले यांनी केला असून उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर व शिवणी येथील शिनापत्र सीना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर कायदेशीर कडक कारवाई करावी त्याच बरोबर अवैध वाळू उपसा बाबत  जबाबदार असणाऱ्या प्रांत अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडल अधिकारी व तलाठी  यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात यावी

*वाळू माफिया यांना मोक्का लावा अन्यथा उपोषण*  नंदूर पाकणी शिवणी येथील अवैध वाळू उपसा बाबत या यापूर्वी देखील अनेक तक्रारी असून देखील महसूल प्रशासन कारवाई करत नाही पंचनामा करत नाही वाळू उपसा च्या ठिकाणी असलेल्या शेतकरी च्या शेतावर बोजा चढवत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसून वाळू माफियावर लवकरात लवकर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा उपोषण करणार असल्याची माहिती 

अधिकार कार्यकर्ते  श्रीकांत कोळी व बाळकृष्ण सदाफुले यांनी दिली असून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या