दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत केल्याने,समान्य जनतेला त्रासदायक, तर व्यवसायिकांना लाभदायक, स्थलांतर रद्द करण्याची वकिल संघाची मागणी

 दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत केल्याने,समान्य जनतेला त्रासदायक, तर व्यवसायिकांना लाभदायक, स्थलांतर रद्द करण्याची वकिल संघाची मागणी 




गंगाखेड प्रतिनिधी :- येथील तहसील कार्यालय परिसरात असलेले दुय्यम निबंधक श्रेणी १ चे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट घातला असुन या ठिकाणी इतर कार्यालय असल्याने दुय्यम निबंधक कार्यलय सोयीचे आहे.हे कार्यालय इतरत्र कोठेही स्थलांतरीत करू नये अशी मागणी वकिल संघाच्या वतीने महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तहसीलदार याच्या मार्फत दि.१९ डिसेंबर रोजी निवेदनाद्धारे केली आहे. 



   दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालय स्थापनेपासून तहसील कार्यालय परिसरात आहे.कार्यालयासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध आहे.मात्र असे असतांना एका प्राॅपर्टी डिलरच्या खाजगी मालमत्ते मध्ये ५ किलोमीटर असलेल्या ग्रामपंचायत परीसरात स्थलांतर घाट रचला जात आहे.खाजगी डिलरने २ प्लाॅट दानपत्र करून दिले आहे.त्यामुळे सदर 

व्यवसायीकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्तेची किंमत वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेचे हस्तांतरण, खरेदीखत ,गहाणखत, दत्तकपत्र, शोध अर्ज, नक्कलेचे अर्ज, इत्यादी कामे करण्यासाठी कार्यालयामध्ये वकिल, पक्षकार, व सर्व सामान्य नागरीकाची कामे असतात.सदर कार्यालय शहरापासुन ५ किलोमीटर अंतरावर घेऊन जाणे हे जनतेसाठी त्रासदायक होणार आहे.

सदर ठिकाणी जाण्या व येण्यासाठी कुठलेही दळण वळणाचे साधन नाही.त्या ठिकाणी लोकवस्ती, शासकीय कार्यालय नाहित.सदर कार्यालयात आर्थिक व्यवहार होत असतात.दुय्यम निबंधक कार्यालय शहरापासुन ५ किलोमीटर अंतरावर नेल्यास आर्थिक व्यवहार करतांना जोखमीचा व चोरट्यांना सुलभतेचा होणार आहे. वर्दळ नसलेल्या आडमार्गाने जाताना चोरट्या पासुन जिवितास धोका संभवतो.सध्य स्थितीत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय तहसील , न्यायालय,भुमी अभिलेख, पंचायत समिती, पोलीस स्टेशन आदी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आहे.यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत करण्यात येऊ नये असे निवेदन वकिल संघाच्या वतीने देण्यात आले आहे.या निवेदनावर वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.सुधीर मुंढे, सचिव तनवीर अहेमद एम.शेख, ॲड.अनिल सावंत, ॲड.सुनिल सावंत, ॲड.मिरा सिसोदीया, ॲड.बि.जी.शेटे.ॲड.एन.आर.काकाणी, ॲड.एच.एस.शेटे, ॲड.राम गायकवाड,

अँड व्हि व्हि निळेकर, अँड मिलिंद सिरसागर,अँड बि बी फड,ॲड.दिपक पैळ, ॲड.लहु कुलकर्णी, ॲड.मोहळेकर, ॲड.एस.के.महाजन, अँड एस जी फड, ॲड.व्ही.आर.साळवे, अँड एस जी मस्के आदीसह इतर वकिलाच्या स्वाक्ष-या आहेत.यावेळी वकिल संघाकडुन दुय्यम निबंधक कार्यालयाला घेणार घालुन स्थलांतराचा प्रस्ताव तात्काळ रद्द करा अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल आशी मागणी वकिल संघातुन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या