फळा येथील उभरत नेतृत्व, हृदय विकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोक कळा पसरली.
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- पालम तालुक्यातील मौजे फळा येथील तरुण तडफदार व सर्वांशी मनमिळाऊपणाने वागणारे फळा येथील सेवा सोसायटीचे चेअरमन अशोकराव बालासाहेब पौष, वय वर्षे 51 यांना 29 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली
अशोकराव पौळ यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांचे गाव मौजे फळा व पालम तालुक्यातील सर्व मित्र परिवारात शोककळा पसरली आहे
पालम तालुक्यातील धडाडीचे नेतृत्व शांत व संयमशील स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजकीय नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याने पालम तालुक्यातील एक करता धरता उभारता नेता हरवला पालम
अखेर आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना या उक्तीप्रमाणे पालम तालुक्यातील मौजे फळा येतील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा फळा देवस्थानातील एक हरहुन्नरी नेतृत्व गमावल्याचं फळा वासियांना दुःख होत आहे,
अशोकराव पौळ यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दु:खद घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सूना, भाऊ,बहीण, नातवंड असा परिवार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार सायंकाळी ५ वाजण्याचे सुमारास फळा येथे गोदाकाठावर वैकुंठ धाम स्मशान भूमीत करण्यात आले आहेत.



0 टिप्पण्या