माळेगावच्या खंडोबाची यात्रा, नांदेड जिल्ह्यातील एक मेव सर्व धर्मीय सलोखा असणारा आदर्शवत महोत्सव.

 माळेगावच्या खंडोबाची यात्रा, नांदेड जिल्ह्यातील एक मेव सर्व धर्मीय सलोखा असणारा आदर्शवत महोत्सव.



लोहा प्रतिनिधी बळीराम येवले :- महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील माळेगाव येथे खंडोबाची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला भरते,वंशपरंपरेने यात्रेतील पालखीचा मान रिसनगावच्या नाईक घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे.


महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांच माळेगाव यात्रा महेर समजलं जातं, या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी,गोंधळय़ांची गाणी,वारू नाचविणे,आराध्यांची गाणी,ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ,संगीत बारी याशिवाय,बहुरूपी रायरंद,वासुदेव, स्मशान जोगी,मरीआईवाले,अशा विविध लोककलावंतांच्या  कलांचे प्रदर्शन तसेच,गुरांचा बाजार व विविध भटक्या विमुक्त जातींच्या जातपंचायती ही यात्रेचे प्रमुख वैशिष्टये आहेत.यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री,शर्यती,प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल,लोककला,संगीत वाद्य,लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने भरणारी माळेगावची यात्रा सध्या पाच दिवस भरते.


भटक्या जमातींच्या गोसावी,गारुडी,घिसाडी,जोशी, कोल्हाटी,मसणजोगी,नंदीवाले,पांगुळ,वासुदेव,वैदु आदी भटक्या व विमुक्ताच्या.जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो.या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे,गुन्हे,कौटुंबिक प्रश्न,देवाणघेवाण,सोयरीकी इत्यादी गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या