अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या बांधणीचा झंझावात,विनोद अण्णा भोसले प्रदेशाध्यक्ष.
गंगाखेड प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी,व जनसामान्यांच्या हक्क व न्यायासाठी, कार्य दक्ष व कार्य तत्पर असणारी,अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना, शहरासह ग्रामीण भागात ही पोहोचवण्यासाठी, प्रदेशाध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांच्या नेतृत्वाखाली,
https://youtu.be/5k5LcVkLCOs
महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख श्री शेषराव सोपणे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत असताना, परभणी जिल्ह्यातही अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या, संघटना बांधणीसाठी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अविरत प्रयत्न केले जात आहेत,
याच पार्श्वभूमीवर परभणी येथील जिल्हा कार्यालयात, आयोजित केलेल्या विशेष बैठकीत, पोलिस हक्क संरक्षण संघटनेच्या गंगाखेड तालुका सचिव पदी, श्री सयद फरीद
यांची निवड करून, नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले,व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या,
या बैठकीला जिल्हा कार्यध्यक्ष श्री मधुकर मुळे,गंगाखेड तालुका उपाध्यक्ष श्री सोपानराव टोले,अखिल भारतीय ग्राहक पंचायत माजी परभणी तालुका अध्यक्ष अब्दुल रहीम उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मधुकर मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन परभणी जिल्हा अध्यक्ष ग्रामीण श्री गोपाळ कच्छवे यांनी केले,



0 टिप्पण्या