पालम आणि परिसरातील जनतेची बसस्थानकाची प्रतिक्षा कधी संपणार, राजकीय शडयंत्र म्हणायचे का,जनतेची दिशाभूल?

 


पालम आणि परिसरातील जनतेची बसस्थानकाची प्रतिक्षा कधी संपणार, राजकीय शडयंत्र म्हणायचे का,जनतेची दिशाभूल?



पालम प्रतिनिधी :- पालम शहराला तालुक्याचा दर्जा मिळून 30 वर्षे उलटली, तरी पालम येथे बसस्थानक झाले नसल्याने, आश्वासनांची खैरात देऊन, मतदारांना दिशाभूल करण्यासाठी, हे मतादन मिळवण्यासाठी केलेलं शडयंत्र म्हणायचे का जनतेची दिशाभूल,अशी चर्चा जनसमान्य जनतेतून होत आहे.



परिवहन विभागाला अनेक वेळा बसस्थानक निर्मिती साठी निवेदनाद्वारे कळवले,पण परिवहन विभाग सखरझोपेच आहे,पालम शहरातून पुणे-नांदेड हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग व परभणी-लातुर हा राज्यमार्ग जातो.


पालम हे अनेक खेडी,वाडी वस्तीसाठी बाजार पेठ असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना येथूनच बाहेरगावी  येजा करावी  लागते.पालममधे बसस्थानक नसल्याने, महिला प्रवाशांची व वयवृध्द प्रवाशांचे,उन,वारा,पाऊस, इत्यादी नैसर्गिक व रात्री बेरात्री आलेल्या प्रवाशांना थांबण्याची सोय नसल्याने, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन थांबावे लागते, स्त्रिया, मुलींना व वयोवृद्ध प्रवाशांना  याचा जास्त ञास  होत आहे.


तालुक्याचे ठिकाण असताना परिवहन महामंडळाचा एकही कर्मचारी येथे कधीच उपस्थित नसतो,त्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्ष वगैरे काही प्रकार येथे अस्तित्वातच नाही . कुठली गाडी कधी किती वाजता  येणार याचा गाड्यांचा वेळापत्रक फलक लावायचे कष्ट परिवहन महामंडळाने इथे  घेतलेले नाहीत.त्यामुळे एसटी कुठल्या मार्गावर कधी येणार ,हे नेमके कोणाला विचारायचे हा प्रश्न प्रवाशांना भेडसावत असतो.बसस्थानकच अस्तित्वात नाही त्यामुळे प्रवाशांसाठी  शौचालय, पिण्याचे पाणी वगैरे सुविधांचा तर विषयच नाही.कुठलीही एसटी कधीच वेळेवर येत नाही, आणि आल्या की एकाच मार्गावर दोन तिन गाड्या एकामागोमाग येतात.या महामार्गावर इतरही वाहतूक चालु असल्याने कधीकधी हा महामार्गही जाम होतो.कधीकधी एसटी चालक त्यांना वाटेल तिथे गाडी थांबवतात,त्यामुळे प्रवाशांची सामान,लहान मुलं,वयोवृद्ध माणसं घेऊन तिथपर्यंत धावत पळत जायची कसरत करावी लागते.

कुठलेच नियोजन नसल्याचा फटका नाहक प्रवाशांना भोगावा लागणे ही नित्याचीच बाब झाली आहे.या सगळ्या परिवहन महामंडळाच्या गलथानपणा मुळे येथे अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आलेले आहेत.

     मागील 30 वर्षापासून मतदारसंघात अनेक आमदार झाले,त्यांनीही आश्वासन देण्यापलिकडे  पुढे काहीच केले नाही.पालममधील काही सजग नागरिकांनी,बसस्थानक संघर्ष समीती स्थापन करून,प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली परंतु प्रशासकीय स्तरावर,आजपर्यंत काहीच  झालेले दिसुन येत नाही.यामुळे राजकीय शडयंत्र तर नाही ना,कारण पालमच्या हक्काची बसस्थानकाची मागणी कधी पुर्ण होणार व होणारी ससेहोलपट कोण संपवणार असा अनुत्तरीत प्रश्न सध्या पालमवाशियांना भेडसावत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या