बाईकच्या शोकांसाठी बायकोला धोका, नवरा सांगतो माहेराहून आण खोका, कहर झाला घरधण्याचा, म्हणून मार्ग धरला पोलीस ठाण्याचा,

 बाईकच्या शोकांसाठी बायकोला धोका, नवरा सांगतो माहेराहून आण खोका, कहर झाला घरधण्याचा, म्हणून मार्ग धरला पोलीस ठाण्याचा,




मोटारसायकलसाठी विवाहितेचा छळ ७ जणावर गुन्हा दाखल 


गंगाखेड प्रतिनिधी राजकुमार मुंढे :- विवाहिता वैष्णवी ज्ञानेश्वर भंडारवाड सासर देवठाणा ता.पुर्णा, हल्ल मुक्काम सुप्पा ता.गंगाखेड या विवाहितेने मोटारसायकल साठी एक लाख आणण्यासाठी होत असलेल्या, सासरच्या जाचाला कंटाळून, पिंपळदरी ता.गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सासरच्या ७ जणावर दि.१३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल.


      सुप्पा ता.गंगाखेड येथिल वैष्णवीचा विवाह पुर्णा तालुक्यातील देवठाणा येथिल ज्ञानेश्वर भंडारवाड याच्या सोबत झाला.लग्नानंतर पती दारू पिऊन मारहाण करत होता.दिर वैजनाथ भंडारवाडा हा शिविगाळ करायचा, सासु चंदाबाई भंडारवाड व सासरा सुर्यकात भंडारवाड हे पतीला सागुन मारहाण व शिविगाळ करायला लावायचे.लग्ण जमवणारे सुप्पा येथिल मावस नणंद गोदावरी सुनेवाड, मावस नणंदाचा पती गोपिनाथ सुनेवाड, मावस नणंदची सासु इंदुबाई सुनेवाड याना सासरची मंडळी मोटारसायकलची मागणी करीत आहेत म्हणून सागितले असता त्यानी आमची इज्जत घालुनका त्याना पैशे द्या म्हणून शिविगाळ केली.त्यानंतर सोन्याची अंगठी मागतली.अशी सासरच्या मंडळीनी मागणी करत उपाशी ठेवून शिविगाळ करून मारहाण करत होते.अंगावरील सोन्याचे दागिने सासरच्या मंडळीनी काढून घेतले.सासरच्या या त्रासाला कंटाळून वडिलानी माहेरला घेऊन आले.माहेरील पिंपळदरी पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार विवाहिता वैष्णवी भंडारवाड हीने दिली.या तक्रारीवरून पती ज्ञानेश्वर भंडारवाड, सासरा सुर्यकात भंडारवाड, सासु चंदाबाई भंडारवाड, रा.देवठाणा ता.पुर्णा, मावस नणंद गोदावरीबाई सुनेवाड, मावस नणंदचा पती गोपिनाथ सुनेवाड, मावस नणंदची सासु इंदुबाई सुनेवाड रा.सुप्पा ता.गंगाखेड याच्यावर पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या