परभणी येथे वारकरी साहित्य परिषदेचे 11 वे अखिल भारत संत साहित्य संमेलन
परभणी: वाकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेण्यात येते. यावर्षीचे 11 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन परभणी येथे आयोजित केलेले आहे. या संमेलनाच्या नियोजनाची बैठक चंद्राबाई वारकरी शिक्षण संस्था परभणी येथे सकाळी 11 वाजता झाली.
वारकरी साहित्य परिषदेचे संंस्थापक अध्यक्ष ह.भ.प.विठ्ठल पाटील काकाजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. यावर्षीचे संमेलन हे मराठवाड्यातील संतभूमी परभणी येथे होणार आहे. या संंमेेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मा. वारकरी संप्रदायाचे पाईक खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. सदर बैठकीला ह. भ. प. श्रीकांत महाराज ठाकूरबुवा तसेच वारकरी साहित्य परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ह. भ. प. माऊली महाराज दाभाडे, नांदेड जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. व्यंकट महाराज गुळवे, ह. भ. प. राजेश्वर महाराज पांचाळ, हिंगोली जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. फुलाजी महाराज शेळके व अकोला जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शिवशंकर महाराज पाटील व जिल्हा समन्वयक विठ्ठल कदम व मा. श्री डॉ. मारुती आवरगंड तसेच ह.भ.प. रणधीर महाराज देशमुख, ह.भ.प. महादेव महाराज ढवळे, ह.भ.प. मधुकर महाराज वावरे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज कथारे हे उपस्थित होते.


0 टिप्पण्या