भारत जोडो यात्रे ला पालम तालुक्यातून शेकडो कार्येकर्ते नांदेड येथे रवाना
पालम तालुका प्रतिनिधी / अवधूत जाधव
मा. श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी गुरुवारी नांदेड शहरात दाखल होत आहे. या निमित्त सायंकाळी ५ वाजता मोंढा मैदान येथे त्यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड जिल्यात भारत जोडो यात्रेचा मुकाम हा पाच दिवस असणार आहे दररोज पंचवीस किलो मीटर चे अंतर हे राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्या सोबत पायी जालणार आहेत
या यात्रे चे काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरु झाले आहे भारत जोडो यात्रा नियोजना साठी सहविस (26) पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
या यात्रे साठी पालम तालुका आध्यक्ष,व शहर कॉंग्रेसच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे
हे नियोजन हे मा. मा. आमदार सुरेशराव वरपुडकर आमदार तथा जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी, परभणी यांच्या मार्गदर्शना केले जात आहे
. पालम तालुका आध्यक्ष कृष्णा भोसले यांनी पालम तालुक्यातील अनेक खेड्या पाड्यात जाऊन कॉंग्रेस पक्षाची विचारधारा या बाबत खेडो पाड्यांमध्ये जाऊन मार्गदर्शन केले त्यामुळे
या यात्रेसाठी सर्वसामन्य नागरिक सुद्धा मोड्या उत्सहात हजर होत आहेत त्यामुळे भारत जोडो यात्रे ला पालम तालुक्यातून शेकडो कार्येकर्ते रवाना झाले असल्याचे दिसून येत आहे
या वेळी पालम तालुका आध्यक्ष कृष्णा भोसले यांनी मा. श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रे मुळे काय साध्ये होणार या बाबत कार्येकर्ते व जनतेला मार्गदर्शन केले भारत जोडो यात्रे मुळे कॉंग्रेस पक्षाला खूप मोठा फायदा होणार आहे असे भोसले यांनी सांगितले


0 टिप्पण्या