पालम ट्राफिक पोलिसांकडून जनतेची आर्थिक लूट

 पालम ट्राफिक पोलिसांकडून जनतेची आर्थिक लूट 



ऐन सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठ खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना  ट्राफिक पोलिसांकडून जाणीवपूर्वक भुर्दंड


पालम  तालुका प्रतिनिधी  :  अवधूत जाधव

 पालम ट्राफिक पोलीसांचा मनमानी कारभार  चालू आहे .ऐन सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठ खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना भुर्दंड लावत आहेत. विशेष म्हणजे पालम मध्ये आतापर्यंत कोणतीही पुर्व सुचना न देता मनानेच कोठेही थांबून गाडी वाल्यांना फाइन करत आहेत त्यामुळे बाजारात खरेदी करताना लोकांना विचार करावा लागत आहे

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये  सणासुदीच्या वेळी खरेदीसाठी जात असताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे पालम मध्ये कोठेच नो पार्किंग झोन तयार केलेले नाहीत

 वा तशी कोणतीच तजबीज केलेली नाही. पोलीसांनी वर्दीवर असताना कोणतेही अनाधिकृत कृत्य करण्यास कायद्याने गुन्हा आहे

 पण पालम ट्रॉफीक पोलीस यांना न जुमानता सरास गुटका , मावा ,खाऊन बिनधास्त फिरताना नेहमीच   दिसत असतात ऐन दिवाळीत सनासुदीच्या दिवसांत वसुली सुरू केली आहे 

यामुळे सामान्य जनता पोलीस प्रशासनावर नाराज असल्याचे दिसून येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या