महावितरणचा भोंगळ कारोभार 


  वीज ग्राहकात तीव्र नाराजी .




पालम प्रतिनिधी.अवधूत जाधव


पालम   :  तालुक्यातील महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा अनेकदा समोर येत आहे.

ग्राहकावर वाढीव बिलाचा डोंगर नागरिकांना अव्वाच्या सव्वा विजेची बिलं महावितरणकडून आकारली जात आहेत. ऐनसणासुदीच्या काळात  मागील कोरोणा काळात  दिपावली सण हा  आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला नव्हता.पण आता कोरोणा काळ पुर्ण पणे संपला असुन,  आनंदमय वातावरणात दिपावली सण साजरा करण्याच्या उत्सवात  मध्येच  महावितरण कडुन  रिडींग पाहण्यासाठी नेमण्यात आलेल्या  संस्थेकडून ग्राहाकाचे मिटर रिडींग न पाहता  सरासरी ओव्हरेज बिल ग्राहकांना दिल्या जात आहे  .रिडींग कमी  असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची? 

असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात होत आहे

विज बिले वेळेवर नाही भरली तर   कुठलीही पुर्व सुचना न देता वीज कनेक्शन तोडत , असल्यामुळे  वीज ग्राहक मोठ्या अडचणीत सापडला  आहे    त्यामुळे 

 सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरण कडुन  वाढीव वीज बिलांचा शॉक दिला  जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना भरमसाट बिल पाठवलं आहे. काही ग्राहकांना तर १० हजार रुपयांची वीज बिलं आली आहेत. 

अनेक ग्राहकांनी सरासरी वीज बिलंही भरली, तरीही महावितरणने त्यांना मोठ्या रकमेची वीज बिलं पाठवली. 

याबाबत महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा केला, तेव्हा कमी मनुष्यबळ   मीटर बिल रिडीगसाठी माणुसच गायब असतो की,काय काही ही कारण देत टोलवाटोलंव केली  जातेय

कमी-अधिक फरकाने प्रत्येक वीज ग्राहकाची हीच तक्रार आहे. ग्राहक जे बिल असेल ते भरायला तयार आहे. पण ते वीज बिल नेमकं आणि अचूक असावं, हीच ग्राहकांची अपेक्षा आहे. 


 महावितरण विभागाने घरोघरी जाऊन  दर महिण्याची  रिडींग घेतल्याशिवाय  बिल अदा करू नये.  जर असा प्रकार झालाच तर यापुढे आपण महावितरण कार्यालया विरोधात आंदोलन करणार असे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय कुमार शिदे यांनी म्हटले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या