प्लास्टिक पिशव्यां वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्लास्टिक पिशव्यां बंदी कागदावरच
पालम तालुका प्रतिनिधी :अवधूत जाधव
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असली, तरीही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. पालम शहरात विविध ठिकाणी किराणा दूकान व औषध विक्रता फळ विक्रेता, भाजीपाला विक्रेता हे नेहमी प्लास्टिक पिशव्यां चा वापर करत आहेत
राज्यसरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली असली, तरी प्रत्यक्षात जनजागृती अभावामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे
. त्यामुळे शासनाने घातलेली बंदी कागदावरच राहिली आहे. आता प्लास्टिक पिशव्यांच्या वापराच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिका-यानी जिल्हाभर प्लास्टीक बंदी करण्याचे आदेश बैठकीत दिले.
शहरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर राज्याच्या पर्यावरण विभागाने बंदी घातली. हा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी रखडली होती.
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबतच्या रखडलेल्या बंदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.
यापूर्वी ५० मायक्राॅपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करनार्याना दहा हजार, दंड व विक्रेत्यांना एक हजार, तर वापर करणाना पाच शे रुपये दंडाची तरतूद होती.
परंतु आता सरकारने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावरच बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणा-या प्लास्टिक उत्पादकांना लाख रुपये दंड व एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षेची तरतूद केली आहे.
नव्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारासह भाजीपाला फळविक्रता दंडात्मक कारवाई होणार असल्याचा बोलबाला करून पालम शहरासह जैसै थे परिस्थिती पहायला मिळत आहे पाहवयास मिळत आहे


0 टिप्पण्या