शरद युवा संवाद यात्रेस प्रचंड प्रतिसाद
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव
आज दि 14/10/2022 रोजी शरद युवा संवाद यात्रेच्या सहाव्या पर्वाच्या निमित्ताने पालम शहरात
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेली 'शरद युवा संवाद यात्रा' पालम शहरात पोहोचल्यानंतर या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमासाठी भर पावसातही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार तळागाळातील लोकांसमोर पोहचण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कटीबद्ध आहेत
हेच आज पाहायला मिळाले..
यावेळी प्रचंड पाऊस चालू असताना देखील शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक तरुण युवक भर पावसातही उपस्थित होते तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पण मोठ्या उत्साहात यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालम तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष वसंतराव काका सिरस्कर, शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष इमदाद खाँ पठाण , जेष्ट नेते गोपीनाथ तुडमे मामा , सदाशिव आप्पा ढोले,जि पा सदस्य शंकरराव वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयकुमार शिंदे, हाजीभाई कुरेशी , पंचायत समिती माजी सभापती नामदेव कदम, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे,
नगरपंचायत चे नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती शेपभाई चाऊस, नगरसेवक तथा बांधकाम सभापती प्रभाकरराव सिरस्कर, नगरसेवक संजय भाऊ थिट्टे, नगरसेवक सय्यद ईखारभाई, नगरसेवक सुगंध हिवरे,लालखाॅ पठाण, शेख अकबर भाई, दत्तराव घोरपडे, शेख मकदुमभाई, युवक तालुकाध्यक्ष बळीराम चौवरे , युवक शहराध्यक्ष सय्यद मुसतकी , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा संघटक भैय्या साहेब सिरस्कर, युवक उपध्यक्ष रईस कुरेशी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ,शगीर सरवरी,शेख नविदभाई, सय्यद सिकंदर, सय्यद फारूख, शेख इरफान, शिवानंद गव्हाने,माधव शिंदे, हनुमान कराळे,राजु खंडागळे, नितीन पळसकर,माणीक घोरपडे, किशोर कदम व आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांनी पालम तालुक्यातील युवकांशी संवाद साधत आपले विचार व्यक्त केले


0 टिप्पण्या