काँग्रेस तालुका अध्यक्ष कृष्णा भोसले यांच्या हस्ते राजनंदिनीचा सत्कार
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव
पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव येथील राजनंदिनी दिनेश शिंदे या विद्यार्थिनी परभणी जिल्ह्यामधून NEET परीक्षेमध्ये 652 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकविला त्यामुळे राजनंदिनीचा पेठ पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर मध्ये सत्कार ठेवण्यात आला यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब भोसले यांनी राजनंदिनीचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला,
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयकुमार शिंदे यांनीही राजनंदिनी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्याचबरोबर काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले हे यावेळी उपस्थित होते, सदरील सत्काराचा कार्यक्रम हा काँग्रेस तालुका अध्यक्ष कृष्णा भाऊसाहेब भोसले यांनी ठेवला होता या वेळी गावातील आदर्श शिक्षक दगडूपंत अण्णा शिंदे, सोसायटीचे चेअरमन रमेशराव शिंदे माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोकराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा शिंदे, मराठा सेवा संघाचे कार्यकारणी सदस्य अनंतराव शिंदे, डॉक्टर अमोल शिंदे, सतीश जाधव, भगवान शिंदे , किरण पवार, योगेश जाधव आदी गावातील नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती


0 टिप्पण्या