रस्त्यासाठी माहेर गावातील गावकर्याचे लहान मुलांसह उपोषण
पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव
पूर्णा तालुक्यातील माहेर गावकरी आपल्या मागणीवर ठाम असून सलग तिसऱ्या दिवशी दिनांक २८सप्टेबर रोजी त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. रस्त्याच्या मागणीसाठी माहेरकरांनी या आंदोलनात चक्क चिखलामध्ये लोळून आपले अंग भरून जिल्हा प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.
अनेक वर्षांपासून गावकऱ्यांची रस्त्याची मागणी आहे. ही मागणी पूर्ण व्हावी अशी भावनिक साद सर्व गावकरी घालत आहेत.तरी याकडे बाबतीत लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याचे या गावातील लोकांमधून बोलल्या जात आहे
या रस्त्याची अडचण लक्षात घेत या आंदोलनात वयोवृद्धासह तरुण व बालक आता सहभागी होऊ लागले आहेत.
आपल्या शाळेला रस्ता मिळावा, आपल्या गावाला रस्ता मिळावा अशा भावना सर्वसामान्य माहेरकरांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. रस्ता व मूलभूत सुविधा मिळाव्या या मागणी साठी माहेरकर दररोज होणारे वेगळे आंदोलन करीत आहेत.
गावकरांच्या भावना व त्यांच्या अडचणी बाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जनसामान्यातून होऊ लागली आहे.


0 टिप्पण्या