पेठ पिंपळगाव येथे स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त घनवक्षृ लागवड कार्यक्रम संपन्न

 पेठ पिंपळगाव येथे स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त घनवक्षृ लागवड कार्यक्रम संपन्न


पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथे स्वातंत्राच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत घनवृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी फळबाग लागवड,शेततळे आदी उपक्रम शासनाच्या वतीने राबविली गेलेली उपक्रमाची  पाहणी व तसेच परभणी जिल्ह्यातील युवकांना


 परंपरागत पिकांऐवजी फळबाग लागवड  कडे तसेच कृषीवर आधारित उद्योगांकडे कसं वळवता येईल यासंदर्भात मार्गदर्शन पर प्रोत्साहन त्याचबरोबर राबविण्यात येणाऱ्या कामांची शहानिशा स्वतः करून घेऊन शेतकऱ्यांशी त्यांनी हितगुज साधला परभणी जिल्ह्याला जेव्हापासून माननीय आंचल गोयल मॅडम जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या तेव्हापासून त्यांचा शेतकऱ्यां प्रति व त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावताना दिसत आहेत

  यावेळी उपस्थितांमध्ये माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल मॅडम, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील साहेब,  तहसीलदार  प्रतिभा गोरे मॅडम,पालम पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रदिपजी काकडे साहेब, गटविकास अधिकारी शिसोदे साहेब, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाऊसाहेब  भोसले साहेब, पालम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा भोसले,माननीय पांडुरंग शिगेदार साहेब, डॉ. प्रकाशजी शिगेदार साहेब, राजू शेठ मुंदडा साहेब, चेअरमन रमेशराव शिंदे, सरपंच जिजाराम अंगिलवाड, उपसरपंच राजेश शिंदे, कैलास  शिंदे, काशिनाथ शिंदे, राजधर भोसले,  रमेश शिंदे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी माननीय तमशेटे साहेब, मुंजाजीराव दुधाटे साहेब, तलाठी शिंदे साहेब, माननीय नंदू  पवार साहेब, श्री  मुंजा दुधाटे साहेब ,आदींनी प्रयत्न केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या