भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली त्या निमित्ताने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
परांडा प्रतिनिधी राहुल साळुंखे :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आंबी पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण माध्यमिक विद्यालय, कुकडगाव व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा राष्ट्रध्वज हाताळण्यातबाबत मार्गदर्शक तत्त्वे तसेच हर घर तिरंगा बाबत शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच सरकारी व सैन्यदलात सहभागी होणे बाबत मार्गदर्शन करून
समाजातील प्रत्येक माता-भगिनींना राज्य घटनेमुळे सुरक्षित जगण्याचा अधिकार मिळाला आहे यासाठी त्यांचे हक्क व कायदे या बाबत जनजागृती करून गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच प्रतिबंध होण्यासाठी अंबी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी मार्गदर्शन केले व डिजिटल आणि इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी क्षेत्र पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करून सुसंवाद साधला.
तसेच सध्या कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत डायल 112 व पर्यावरण अबाधित राहावे यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे याबाबत देखील मार्गदर्शन केले.पोलीस दीदी व पोलिस काका यांच्या माध्यमातून पोलिसांविषयी असलेले,गैरसमज,वाहतुकीचे नियम,बाल लैंगिक अत्याचार, व्यसनमुक्ती व गुडटच बॅडटच याबाबत देखील मार्गदर्शन केले.
कायदेविषयक असलेले ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना समजावून सांगितले. पोलीस दलातील सध्या वापरात असलेले स्वयंचलित हत्यारे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देण्यात येऊन ती त्यांना हाताळण्यासाठी देण्यात आली. सदर कार्यक्रम हा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक नवनित कावट, उपविभागीय पोलिस अधिकारी,भूम श्री दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर,पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण माने,पोलीस नाईक फिरोज शेख, महिला पोलीस अंमलदार सुनीता पवार यांनी हजर राहून योग्य ते मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी कल्याणी माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक हनुमंत शिरसागर, संस्थाचालक बाळासाहेब गटकळ व शिक्षक वृंद तसेच सोनारी येथील कार्यक्रमाचे वेळी मुख्याध्यापक कुलकर्णी,सरपंच दुबळे,गावातील पालक व पत्रकार हे देखील मोठ्या संख्येने हजर होते.

0 टिप्पण्या