पालम तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन

 पालम तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसीलदार यांना  विविध मागण्यांचे निवेदन


पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :-पालम तालुक्यामध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातील पिके सुपीक मातीसह वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे 

त्यामुळेशेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या दुष्कांनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान द्यावे त्याचबरोबर बागायत शेतकऱ्यांना झालेल्या नुसकानी बाबत वेगळी मदत करावी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेला जीएसटी रद्द करण्यात यावा

 अशा विविध मागण्यासह पालम तालुका काँग्रेस कमिटी तर्फे माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष कृष्णा भाऊसाहेब भोसले,   शहराध्यक्ष शेख अहमद ,खाजा मिया  ,हबीब चाऊस, अकबर साब पठाण, माधवराव फाजगे, उत्तमराव घादगे, बबनराव पांचाळ ,माधव गिरी, अनिल शिंदे अविनाश शिंदे, रमेश शिंदे, उद्धवराव शिंदे, भीमाशंकर सोनवळे, शिवाजीराव आवळे, रोहिदास एमबलवाड, अमोल शिंदे, राजधर भोसले यांच्यासह आधी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या