विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार अतिवृष्टी दौऱ्यात आले असता,डिपी बद्दल निवेदन सादर
गंगाखेड प्रतिनिधी :- सोनपेठ तालुक्यातील मौजे उक्कडगाव मक्ता अतिवृष्टी पाहणी दौऱ्या निमित्त,महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा दादा पवार साहेब आले असता, विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले,करम येथील 33 केवी सबस्टेशन ट्रांसफार्मवर पहिल्या पंधरा गावा ऐवजी आता चाळीस गावचा भार पडल्याने विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत आहे,यामुळे सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो, करम येथील गावठाण येथील डीपी निकामी झाल्याने, वारा पाऊस आल्यानंतर नेहमी विद्युत पुरवठा खंडित होत आहे,कर्मचारी फोन उचलत नाहीत,फोन उचलला तर, प्रत्येक वेळेस काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करतात, सदर डीपी बदलून देऊन, गावातील सर्व सामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यात यावा, असे निवेदन दशरथ सूर्यवंशी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष सोनपेठ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली, रामेश्वर बचाटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी यांनी दिले,

0 टिप्पण्या