आषाढी एकादशीनिमित्त पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांचे नागरिकांना व भाविक भक्तांना आवाहन
पालम प्रतिनिधी :- सध्या होत असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी,नाले काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहेत. पालम तालुक्यातील
संत मोतीराम महाराज मंदिर,फळा व संत निवृत्तीनाथ महाराज मंदीर ,पेंडू येथे उद्या रविवारी आषाढी एकादशीनिमित्त भाविक हजारोंच्या संख्येने दर्शन घेतात. आज शनिवारी पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दोन्ही ठिकाणची पहाणी केली असून नागरिकांना व भाविक भक्तांना एक जाहिर आवाहन केले आहे.श्री श्रेञ फळा येथे जाताना पालमलगतच लेंडी नदी लागत असुन तीचे पुलावरून 4 ते 5 फुट पाणी जात आहे तर श्री क्षेञ पेंन्डु येथे जातानाही नदी लागत असून तिच्याही पुलावरून किमान 5 ते 6 फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे भाविकांनी पेन्डु येथे जाताना पेठशिवणीकडचा पर्यायी रस्ता व फळा येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता वापरण्याचे व उद्या पुलावरून पाणी जात असेल तर कृपया कोणीही जिव धोक्यात घालून नदी पात्र ओलांडून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
तसेच तालुक्यातील नदीकाठच्या सोमेश्वर, आरखेड, फरकंडा,फुट,दुटका, रहाटी, डिग्रस, भोगाव,बरबडी, सावंगी पेन्डु,पुयणी, कोळवाडी,जवळा,बनवस ,चाटोरी ह्या नदीकाठच्या गावात काही अनुचित घटना घडण्याआधी अथवा घडल्यास तात्काळ पालम पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. यासाठी बीट अंमलदार यांचे फोन नंबर प्रसिद्ध करीत आपल्या कुटुंबांची व पाळीव पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी जनतेला केले आहे.

0 टिप्पण्या