तलाठी पदावरून मंडळाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार

 तलाठी पदावरून मंडळाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार


परभणी प्रतिनिधी प्रसाद पौळ :- पालम तालुक्यातील फरकंडा सज्याचे तलाठी अशोक जाधव यांची सेलू तालुक्यातील वालूर येथे मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती झाबद्दल सत्कार,अशोक जाधव हे फरकंडा येथे गेल्या चार वर्षापासून तलाठी म्हणून कार्यरत असताना फरकंडा सज्जातील ग्रामस्थांना विविध योजनेचे वेळोवेळी मार्गदर्शन केले,

तलाठी सज्जावर कर्तव्य बजावताना नागरिकांना सातबारा उतारा,डिक्लेरेशन इत्यादी कागदपत्राचा वेळोवेळी गरजेप्रमाणे देऊन, लाभार्थ्यांची मने जिंकली, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे फरकंडा सज्जामध्ये ते सर्वांना परिचित झाले होते.जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या आदेशानुसार दिनांक 19 जुलै 2022 रोजी नुकतीच फरकंडा सज्जा मधून सेलू तालुक्यातील वालूर येथे मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती  झाल्याचं पत्र आल्याच समजल्याने, हितचिंतकांकडून अशोक जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपालजी हनवते,फरकंडा गावचे उपसरपंच विलासराव पौळ तसेच रुरल एक्सप्रेस संपादक प्रसाद पौळ यानी ही अशोक जाधव यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या