कुंटूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे संजीवनी समाधी सोहळा उद्या साजरा होणार ...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार :- कुंटूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी संजीवनी समाधी सोहळा मंगळवारी 26 7 2022 रोजी संपन्न होणार आहे यानिमित्ताने सकाळी दहा ते साडेबारापर्यंत दहीहंडीची कीर्तन श्री ह भ प नागोराव भोसले गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे व तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे महापूजन होणार आहे हा समाधी सोहळा कुंटूर येथील मुख्य हनुमान मंदिरामध्ये पार पडणार आहे व कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाचा आयोजन पण करण्यात आलेला आहे या समाधी सोहळ्या कार्यक्रमासाठी कुंटूर येथील शिंपी समाज बांधव व तसेच सर्व गावकरी मंडळी पुढाकार घेऊन कार्यक्रम संपन्न प्रतिवर्षेप्रमाणे करणार आहेत या कार्यक्रमासाठी बाहेर गाऊन भजनी मंडळी व संत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

0 टिप्पण्या